भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन …. बंडापूर्वी नेमकं काय घडलं? आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केले. त्यावेळी एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते’, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी हा दावा केला आहे.

हैदराबादमधील गितम विद्यापीठामध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारण, पर्यावरण, शिवसेनेबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबतही प्रश्न विचारला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी मनमोकळेपणाने उत्तर दिली. विशेष म्हणजे यावेळी उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी मोठा गोप्यस्फोट केला. ‘एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केलं आहे. भाजपसोबत गेलो नाहीतर मी तुरुंगात असेन. एकनाथ शिंदे त्यावेळी मातोश्रीवर येऊन रडले होते’, असे उत्तर ठाकरेंनी दिले.

“शिवसेना सोडून गेलेले ४० आमदार हे स्वत: साठी आणि पैशांसाठी गेले आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून अटक होणार होती” असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते. दरम्यान, शिवसेनेत जवळपास आठ महिन्यांपूर्वी अभूतपूर्व फूट पडली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले. या बंडामुळे मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले.

दरम्यान, महाराष्ट्रात २० जून २०२२ रोजी विधानपरिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या रात्री एकनाथ शिंदे आणि काही आमदार सुरतच्या दिशेने रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे १६ आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले. शिवसेनेच्या ४० आमदारांसह ५२ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!