गॅस सिलेंडर महागले, ग्राहकांना झटका, किती रुपयांची झाली वाढ
मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क/ मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना मोठा झटका बसला आहे, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच गॅसच्या किमती वाढल्या आहेत. गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत.
सलग दुसऱ्या महिन्यात कर्मशिअल गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या महिन्यात १४ रुपयांनी वाढला होता.
दिल्लीत गॅस २५ रुपयांनी तर मुंबईत २६ रुपयांनी महागला आहे. आयओसीएलच्या वेबसाईटनुसार नवे दर आजपासून लागू आहेत. नव्या दरानुसार कमर्शिअल गॅस सिलेंडर दिल्लीत ७९५ , कोलकाता – १०११ , मुंबई – १७४९ , चेन्नई – १९६०.५० रुपये आहे.
घरगुती गॅस सिलेंडरचे दरात कुठलीही वाढ झालेली नाहीत. वाढले नाहीत, ते दर स्थिर आहेत. घरगुती गॅस सिलेंडर दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये, मुंबईत ९०२ रुपये, तर चेन्नईत ९१८ रुपये आहे.