राज्यात महायुतीचा मोठा प्लॅन, प्रचारासाठी २१ हजार सभा, १९ हजार कॉर्नर सभा,३०० वक्त्यांची फौज, सोबत ‘हे’ आहेत स्टार प्रचारक
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या यादीत वीस जागांचा समावेश आहे. युवा उमेदवारांना जास्त संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे, स्मिता वाघ, सुजय विखे पाटील, मिहिर कोटेचा, सुधीर मुनगंटीवार यांना पहिल्यांदाच खासदारकीचं तिकिट देण्यात आलंय. आता गुरुवारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. याच पत्रकार परिषदेत महायुतीतील उर्वरित जागांवरील उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्षाकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा होणं बाकी आहे. मात्र गुरुवारी म्हणजे 28 मार्चला होणाऱ्या पत्रकार परिषदेच ४८ च्या ४८ जागांबाबत चित्र स्पष्ट होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय.
स्टार प्रचारकांची यादी
महायुतीने महाराष्ट्रात ४५+ चा नारा दिला आहे. त्यामुळे उमेदवार जिंकून आणण्यासाठी महायुतीने रणनिती आखली आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र या मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , तसंच योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, अशोक चव्हाण, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांचा समावेश असणार आहे.
नमो संवाद सभा
राज्यातील १९; हजार शक्ती केंद्रावर महायुतीच्या सभा आयोजित करण्यात येणार आहेत. ‘नमो संवाद सभा’ असं संभेचं स्वरुन असणार आहे. यासाठी ३०० वक्त़ांची फौज असणार आहे राज्यात जवळपास २१ हजार सभा होतील. पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात सभा होतील. २०१४ पूर्वीचा भारत आणि २०१४ नंतरचा भारत हे विषय असेल. युवा वर्ग,ज्येष्ठ नागरीक, महिला यांच्यासाठी सरकार ने काय केल याची माहीती दिली जाणार आहे.
४ कोटी नागरिकांपर्यंत पोहचण्याच ध्येय असल्याचं महायुतीने सांगितलंय. व्यापार प्रकोष्ठ, उद्योग प्रकोष्ठ, वाहतूक प्रकोष्ठ अशा विविध घटकांपर्यंत पोहचणार. नव मतदारांपर्यत पोहचण्यासाठी युवा मोर्चा प्रत्येक घरोघरी जाऊन युवकांची भेट घेणार आहे. कॉफी विथ युथ असे कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबवण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रात भाजप १९ हजार कॉर्नर सभा घेणार आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ५० ते ६० छोट्या सभांचे नियोजन करण्यात आलं आहे. विकसित भारत, श्रीराम मंदीर, सीएए, कलम ३७० यांसह स्थानिक घटकांचा विषय या सभांमधून मांडला जाणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागात महिला, युवक, शेतकरी विषयांवर प्रचार केला जाणार आहे. तसंच मोदी आणि महायुती सरकारच्या योजनांचा पाढा वाचला जाणार आहे. शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने नियोजन केलं आहे. प्रत्येक लोकसभा मतदार संघात ३०० ते ४०० कॉर्नर सभा घेण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे.