भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयराष्ट्रीय

लोकसभा निवडणूक : “या” दिवशी भाजप आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार!…यांची नावे असु शकतात पहिल्या यादीत

मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क/ आता देशात पुढील काही दिवसांत निवडणुकीची धामधूम सुरू होणार,सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार येत्या काही दिवसांनी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. पुढील महिन्याच्या मध्यावर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात, यातच भाजप पुढील आठवड्यात गुरुवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसारख्या दिग्गज भाजप नेत्यांची नावे असू शकतात.

सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, भाजप आपल्या पहिल्या यादीत सुमारे १०० उमेदवारांची नावे जाहीर करू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशातील वाराणसीचे खासदार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुजरातमधील गांधीनगरमधून खासदार आहेत. पुढील आठवड्यात गुरुवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून, त्यात उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे,

या बैठकीनंतर भाजप त्याच दिवशी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते. या लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा भाजपचा दावा आहे. तर भाजपने ३७० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!