आ.शिरीष चौधरी यांची विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी निवड
मुंबई,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्र राज्याच्या सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनात तालिका अध्यक्षपदी रावेर-यावल विधानसभा मतदार संघाचे आ. शिरीष मधुकरराव चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी रावेर-यावल मतदारसंघाचे कॉंग्रेसचे आमदार
शिरीष चौधरी ,संजय शिरसाट ,शिवसेना, संभाजीनगर पश्चिम, कालिदास कोळंबकर ,भाजप- वडाळा, मनोहर कालिकापुरे,राष्ट्रवादी, अर्जुनी-मोरगाव या चार आमदारांची निवड विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत केली.
विधीमंडळ अधिवेशन सुरू असतांना विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज पाहण्याची जबाबदारी तालिकाध्यक्षांवर असते. प्रत्येक अधिवेशनात तालिकाध्यक्षपदी विविध आमदारांचे अनुभव आणि ज्येष्ठतेनुसार संबंधित पक्षाचे विधिमंडळ नेते शिफारस करत असतात. त्यानुसार ही निवड होत असते. यानुसार जळगाव जिल्ह्यातून यासाठी आमदार शिरीष चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.