महाराष्ट्रातील 6 जागांसाठी निवडणुका जाहीर,”या” तारखेला मतदान
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 15 राज्यातील 56 जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका जाहीर केल्या असून पुढील महिन्यात 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) आज (29 जानेवारी) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे
यापैकी 13 राज्यांतील 50 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2024 रोजी संपणार आहे, तर दोन राज्यांतील उर्वरित सहा सदस्य 3 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. यात महाराष्ट्रातील 6 जागांचाही समावेश आहे. या निवडणुकांची प्रक्रिया 27 फेब्रुवारीपर्यंत चालेल आणि त्याच दिवशी मतदान होईल. निवडणुक प्रक्रिया 8 फेब्रुवारी पासून सुरू होईल आणि 27 फेब्रुवारीला मतदान होईल. याच दिवशी संध्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल. निकालाची प्रक्रिया 29 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करायची आहे.
15 राज्यातील 56 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशातील 3, बिहार 6, छत्तीसगड 1, गुजरात 4, हरियाणा 1, हिमाचल प्रदेश 1, कर्नाटक 4, मध्य प्रदेश 5, महाराष्ट्र 6, तेलंगणा 3, उत्तर प्रदेश 10, उत्तराखंड 1, पश्चिम बंगाल 5, ओडिशा 3 आणि राजस्थानमधील 3 जागांवर निवडणुका होणार आहेत
कार्यकाळ संपणाऱ्या महाराष्ट्रातील खासदार
कुमार केतकर, — काँग्रेस
वंदना चव्हाण, — राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट
अनिल देसाई, — शिवसेना, ठाकरे गट
प्रकाश जावडेकर, — भाजपा
नारायण राणे, — भाजपा
वी. मुरलीधरण, –भाजपा
निवडणुका का होणार?
राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो. राज्यसभेचे एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. अशाप्रकारे सदनाच्या कामकाजात सातत्य राखले जाते. तर संसदेच्या वरच्या सभागृहाचे सदस्य, राज्य विधानसभेच्या सदस्यांद्वारे निवडले जातात.
निवडणुकीचा असा असेल वेळापत्रक
नोटिफिकेशन – 8 फेब्रुवारी
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – 15 फेब्रुवारी
अर्जांची छाननी – 16 फेब्रुवारी
अर्ज मागे घेण्याची मुदत – 20 फेब्रुवारी
मतदान – 27 फेब्रुवारी (सकाळी 9 ते 4)
मतमोजणी – 27 फेब्रुवारी (सायंकाळी 5)
निकाल – 29 फेब्रुवारी
मतदान प्रक्रिया कशी असते?
मतदान प्रक्रियेत प्रत्येक आमदाराच्या बॅलेट पेपरमध्ये निवडून येण्यासाठी जितके उमेदवार आवश्यक असतात तितके प्राधान्याने हजर राहतात. आमदार उमेदवारांच्या नावांसमोर त्यांची पसंती दर्शवून मतदान करतात. जर एखाद्या उमेदवाराने पहिल्या फेरीत आवश्यक मतांचा कोटा मिळवला तर तो निवडून आल्याचे घोषित केले जाते. मात्र त्याचवेळी कमीत कमी मते मिळालेल्या उमेदवाराला बाद ठरवले जाते आणि त्यांची मते इतर आमदारांनी दर्शविलेल्या पसंतीच्या आधारे उर्वरित उमेदवारांना हस्तांतरित केली जातात. सर्व रिक्त पदे भरेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहते.