भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय

असा असणार महायुतीचा नवा फॉर्म्युला? अडीच तासाच्या बैठकी नंतर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री पवार न बोलताच निघाले

मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल दि. ८ मार्च रोजी शुक्रवारी रात्री उशिरा महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून प्रचारानं वेगही घेतला आहे. मात्र, महाराष्ट्रात अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून जागा वाटपाच्या नव्या फॉर्म्यूल्यावर दिल्लीत या बैठकीत चर्चा झाली असल्याचं समोर आलं आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बावनकुळे उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 3 ते 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार मात्र अजून काही जागा वाढवून घेण्यावर ठाम होते. मात्र, बैठकीत याबाबत काय निर्णय झाला, हे अद्याप समोर आलेलं नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी सुरू असलेली महायुतीची बैठक जवळपास अडीच तासानंतर संपली. बैठकीत महायुतीचा फार्मूला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, महायुतीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार न बोलता निघाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकाच विमानाने मुंबईसाठी रवाना झाले. तर, देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे एकाच फ्लाईटने नागपूरला रवाना झाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!