भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

भोसरी भूखंड घोटाळा ; कोर्टाने दिलेल्या महत्वाच्या निर्णयाने एकनाथ खडसे कुटुंबीयांना मोठा दिलासा!

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l कोर्टानं पिंपरी-चिंचवड मधील कथित भोसरी एमआयडीसीतील भूखंड घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी या तिघांना नोव्हेंबर २०२३ मध्ये हायकोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केला होता,परंतु त्यानंतर आता या तिघांना  नियमित स्वरुपाचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला  आहे. त्या मुळे खडसे कुटुंबियांना  मोठा दिलासा मिळाला आहे.

एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना त्यांनी २०१६ मध्ये त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे भोसरीतील एमआयडीसीमध्ये एक भूखंड खरेदी केला होता. हा भूखंड बाजारभावापेक्षा अगदी कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी या प्रकरणी  पोलिस ठाण्यात एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी मंदाकिनी खडसे व   जावई गिरीश चौधरी यांचेवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी ११ ऑक्टोबर २०२३ रोजी दोषारोपपत्र दाखल केलं होतं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!