काँग्रेसचे माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांचा डॉ.केतकी पाटीलसह भाजप मध्ये प्रवेश
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात भूकम्प होणार असल्याचे संकेत मिळत होते, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वार विश्वास ठेवत काँग्रेसचे नेते डॉ.उल्हास पाटील यांनी आपल्या कन्या डॉ. केतकी पाटील सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आज दिनांक २४ रोजी ठीक २ वाजता मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व कन्या डॉ. केतकी पाटील हे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणारं अशा चर्चा सुरु होत्या त्या चर्चना आता पूर्णविराम मिळाला असून त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेसकडून डॉ उल्हास पाटील यांना कांग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाने निलंबित केल्याच्या कारवाईमुळे जळगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. डॉ. उल्हास पाटील व कन्या डॉ. केतकी पाटील या भाजप मध्ये प्रवेश करतील असे वृत्त “मंडे टू मंडे न्युज” ने दिले होते, त्या प्रमाणे आज मुंबईत प्रवेश सोहळा पार पडला. यात डॉ. उल्हासदादा पाटील, डॉ. केतकीताई पाटील, देवेंद्र मराठे यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह अन्य मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ना. गिरीश महाजन आदी नेत्यांनी यांचे स्वागत केले. याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा कांग्रेस साठी मोठा धक्का मानला जात आहे.
डॉ. केतकी पाटील यांची भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
नुकताच भाजप मध्ये प्रवेश केलेल्या गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र राज्य भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा करून त्यांना निवडीचे नियुक्तीपत्र ही देण्यात आले.