HSC Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांचा मोठा निर्णय
मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क/ नुकत्याच बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी करण्यावर आणि इतर मागण्यांकरिता राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार आंदोलने केल्यानंतरही कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यास नकार दिला आहे.
राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार केल्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंदळकर यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
गेल्यावर्षीदेखील शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीला वेळ लागला होता. त्यानंतर सरकारने काही मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिल्यानंतर शिक्षकांनी बहिष्कार मागे घेतला होता. वेतन, पेन्शन, पदभरती अशा विविध मागण्यांकरिता राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी हा निर्णय घेतला आहे. शिक्षकांनी आपल्या समस्या सांगण्यासाठी वेळोवेळी आंदोलनं केली आहेत. तरीही शिक्षकांच्या समस्या सोडविल्या जात नाहीत. त्याबाबत वारंवार आंदोलने करूनही केवळ आश्वासनापलीकडे काहीच मिळत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.