केंद्रीय मंत्री मंडळाचा विस्तार येत्या चार दिवसात, महाराष्ट्रातुन लॉटरी कोणाची लागणार
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्रात आधी शिवसेना फुटून शिंदे गट तयार झाला.व त्यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली व नऊ आमदार मंत्री झाले. त्या नंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अजित पवार यांनी बंड करत आपल्या काकांची साथ सोडली. राष्ट्रवादीतील मोठा गट हा दादांसोबत बाहेर पडला. अजित पवार सत्ताधारी भाजपसोबत सामिल झाले. थोरल्या पवारांच्या निष्ठावंतांनी अजित पवार यांच्यासोबत राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर उर्वरित ८ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शिवसेना शिंदे गटातील आमदारांच्या पदरी निराशा पडली.
राज्यातील या राजकीय घडामोडींदरम्यान देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारनंतर केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या चार दिवसात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडण्याची शक्यता आहे.
पवार गटाला व शिंदे गटाला केंद्रात मंत्रिपद!
मोठी विशेष बाब म्हणजे आठवड्यापूर्वी भाजपसोबत सत्तेत सामील झालेल्या अजित पवार गटालाही केंद्रात १ मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता पवार गटामुळे शिंदेच्या शिवसेनेला राज्यानंतर केंद्रात सत्तेतील भाकरीतील वाटणीला सामोरं जावं लागणार आहे.
महाराष्ट्राला किती मंत्रिपदं मिळणार?
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राला केंद्रात आणखी २ मंत्रिपदं मिळणार आहेत. त्यापैकी १ मंत्रिपद हे शिंदे गटाला आणि दुसरं मंत्रिपद हे सत्तेतील नव्या वाटेकरी असलेल्या पवार गटाला मिळणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ,६ जणांचा समावेश आहे.त्या पैकी २ दिग्गजांकडे कॅबिनेट आणि इतर चौघांकडे राज्यमंत्रिपद आहे. यामध्ये नितीन गडकरी, नारायण राणे, भागवतराव कराड, भारती पवार आणि कपिल पाटील रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा