भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

राज्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय वा कोणतही शिक्षण मराठीतून कऱणार, मराठी ज्ञानभाषा होणार, फडणवीसांची घोषणा

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार जगभरात व्हावा यासाठी राज्य सरकारतर्फे विश्व मराठी संमेलनाचे आयोजन मुंबईतील वरळी येथे करण्यात आले आहे. ‘मराठी तितुका मेळवावा’ हे विश्व मराठी संमेलनाचे घोषवाक्य आहे. या संमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाष्य करत होते. “जोपर्यंत उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण आणि ज्ञानआधारित अर्थव्यवस्थेवरील शिक्षण हे आपल्या मातृभाषेत होत नाही, तोपर्यंत आमच्या भाषा वैश्विक भाषा होऊ शकत नाही. त्यामुळे मोदींनी नवीन शैक्षणिक धोरणात सर्व राज्यांना सूचना केल्या की, राज्यांनी आपल्या मातृभाषेत सर्व उच्च आणि तंत्रशिक्षणाचा सिलॅबस सुरू करा आणि त्यातून शिक्षण द्या. यात महाराष्ट्राने आघाडी घेतली”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

“महाराष्ट्रात लवकरच अभियांत्रिकी असो वैद्यकीय असो वा कोणतही शिक्षण असो मराठीतून सुरू कऱणार आहोत. त्यामुळे मराठी ज्ञानभाषा होणार”, अशी घोषणाही फडणवीसांनी केली. मराठी टिकेल का? असा प्रश्न विचारला जातो. अशावेळी हा प्रश्न आपण स्वत:ला विचारला पाहिजे. आपणच पुढच्या पिढीला अभिव्यक्तीचे साधन म्हणून आपली भाषा देणार नाही, तर भाषा टिकेल कशी असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला. ‘मातृभाषेचा गोडवा ओळखण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदींच्या लक्षात आले की, भारतीय भाषा टीकवायच्या असतील तर त्यांना ज्ञान भाषांमध्ये रुपांतरीत करावे लागेल’, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!