सोन्या-चांदीच्या दरात घसरण, श्रावणमासात खरेदी करण्याची उत्तम संधी
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याच्या दरात स्थिरता दिसून आली होती. त्यानंतर सातत्याने सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. म्हणूनच श्रावणाच्या महिन्यात सोने खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.
आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,150 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,440 रुपये आहे तर10 ग्रॅम चांदीचा दर 575 रुपये आहे.
देशात येणार ‘वन गोल्ड वन रेट’ योजना
देशात ‘वन गोल्ड वन रेट’ योजना लागू करण्याची मागणीला जोर धरलाय कारण हेच सोने दिल्लीत दुसऱ्या दराने विकले जाते, नंतर पटण्यात दुसऱ्या दराने. तामिळनाडूपासून जम्मू-काश्मीरपर्यंत तुम्हाला सोन्याच्या किमतीत मोठी तफावत दिसेल.
सोने तेच आहे आणि सोन्याची शुद्धताही तीच आहे. कारण बंदरातून सोने आयात करुन उतरवले जाते, तेथून वेगवेगळ्या राज्यांत पाठवले जाते. शिपिंग खर्च इत्यादी जोडल्यानंतर सोन्याची किंमत बदलते. मात्र, आयातीच्या वेळी सोन्याची किंमत समान असते. त्यामुळे येत्या काळात देशात ‘वन गोल्ड वन रेट’ येण्याच्या हालचाली सुरू आहे.
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात. हॉलमार्क (Hallmark)-
सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते