सोन्या-चांदीच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचे दर
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आज सोन्या-चांदीने आठवड्याची सुरुवात भारतीय वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात घसरणीने केली आहे. आज, सोमवार २८ नोव्हेंबर रोजी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव सुरुवातीच्या व्यवहारात ०.२३ टक्क्यांनी घसरला. त्याच वेळी, वायदा बाजारात, चांदी देखील ०.४० टक्क्यांनी घसरत आहे. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचा भाव ०.२५ टक्क्यांनी तर चांदीचा भावही ०.४० टक्क्यांनी घसरला होता.
सोमवारी, २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव १२३ रुपयांनी घसरला आणि सकाळी वायदे बाजारात ५२,४२१ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होता. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव १३१ रुपयांनी घसरला आणि ५२,५४० वर बंद झाला.
सोन्या बरोबर चांदीही घसरली
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये आज चांदीच्या दरातही घसरण दिसून येत आहे. आज चांदीचा भाव २४७ रुपयांनी घसरून ६१,४२९ रुपयांवर व्यवहार करत आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच शुक्रवारी चांदीचा दर २४८ रुपयांनी घसरून ६१,७४५ रुपयांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे भाव घसरले
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. सोन्याचा स्पॉट भाव आज ०.२७ टक्क्यांनी घसरून $१,७४९.६८ प्रति औंस झाला. त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. आज चांदी ० ३४ टक्क्यांनी घसरून २१.०२ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. गेल्या एका महिन्यात सोन्याच्या किमतीत ७.४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी, चांदीचा दर एका महिन्यात ११ टक्क्यांनी वाढला आहे.