भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्र

अखेर आज सोन्याच्या दरात घसरण,चांदीचे दर मात्र स्थिर

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. भाव कमीजास्त होत होते तसेच 2023 या नवीन वर्षाच्या गेल्या दोन दिवसांपासून सोने चांदीच्या दरात लक्षणीय वाढही दिसून आली. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण झाली असून चांदीचे दर स्थिर आहे. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर  50,450 तर 24 कॅरेट साठी 55,040 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 713 रुपये आहे.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.
24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात. सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.
बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!