भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रराष्ट्रीय

आधी बहिणीची हत्या, मग मुंडकं कापून, मुंडक हातात घेऊन निघाला पोलीस ठाण्याच्या दिशेने, पण रस्त्यातच ….

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। एका भावानेच बहिणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर त्याने बहिणीचं शीर कापूर धडावेगळं केलं. यानंतर तो हे शीर हातात घेऊन बाहेर रस्त्यावर पडल्यानंतर लोकांची एकच धावपळ सुरु झाली. आरोपी हे शीर घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, त्याआधीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीच्या प्रेमसंबंधांना विरोध असल्याने आरोपीने हे कृत्य केलं. सध्या आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे.

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी मधील फतेहपूर परिसरात असणाऱ्या मिठवारा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. रियाज असं २५ वर्षीय आरोपीचं नाव असून, त्याने आपल्या १८ वर्षीय बहिण आशिफाची निर्दयीपणे हत्या केली. हत्येआधी दोघांमध्ये मोठा वाद झाला असं पोलिसांनी सांगितलं आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक आशुतोष मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाजने धारदार शस्त्राने बहिणीची हत्या केली. नंतर त्याने तिचं शीर कापलं आणि नंतर ते हातात घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेने चालला होता. पण पोलिसांनी त्याआधीच त्याला अटक केली.

आशिफाचे तिच्याच गावातील तरुण चांदबाबूशी प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी ती त्याच्यासह पळून गेली होती, आशिफाच्या कुटुंबाने यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी आशिफाला पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाकडे सोपवलं होतं. तसंच चांदबाबूची जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, रियाजला अटक केल्यानंतर पोलिसांचं एक पथक ज्या ठिकाणी हत्या झाली तिथे पोहोचले होते. पोलिसांनी घटनास्थळी गेल्यानंतर सर्व पुरावे गोळा केले आहेत. तसंच शीर नसलेला मृतदेहही ताब्यात घेतला आहे. मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती आशुतोष मिश्रा यांनी दिली आहे. रियाजच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या बहिणीच्या नात्याला विरोध होता. यावरुन दोघांमध्ये नेहमी भांडण होत असे आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!