भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

आधी बलात्कार,नंतर लग्न,आणि लगेच घटस्फोट, महिलेची करुण कहाणी

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एका 28 वर्षीय महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्याने कथितपणे तिच्यासोबत बलात्कार केला आणि मग तुरुंगात जावे लागू नये व या आरोपातून वाचण्यासाठी तिच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर लगेच तिला तीन तलाक दिला.ही घटना दिल्लीच्या जवळ गुरूग्राम मधील.

पोलिसांनी बुधवारी सांगितलं की, महिलेने आरोप केला आहे की, समीर अहमद नावाच्या व्यक्तीने पंचायतमध्ये तीन वेळा तलाक म्हटल्यानंतर पत्रांच्या माध्यमातून तिला तलाक दिला होता. महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं की, आरोपी पुन्हानाचा राहणारा आहे. समीर अहमदने माझ्यासोबत 2020 मध्ये शारीरिक संबंध ठेवले होते. जेव्हा मी परिवाराला सांगितलं. तेव्हा ते त्याच्यासोबत बोलले आणि त्याने बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ नये या साठी तो माझ्यासोबत लग्न करण्यास तयार झाला. 29 मे 2020 रोजी मुस्लिम रिती-रिवाजाने आमचा निकाह झाला. पण तो मला कधीही घरी घेऊन गेला नाही’.

पीडितेने सांगितलं की, हे प्रकरण सोडवण्यासाठी जेव्हा माझ्या घरचे लोक पंचायतला घेऊन समीरच्या घरी गेले तेव्हा त्याने तीन तलाक दिला. इतकंच नाही तर त्याने मला पत्राद्वारेही तीन तलाक दिला. आता अहमद आणि त्याच्या परिवाराविरोधात मंगळावारी महिलेने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई लवकरच केली जाईल असं सांगितलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!