भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

राज्यात पुन्हा मास्क सक्ती? आज मुख्यमंत्र्यांची राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. दिल्लीसह कर्नाटक, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्येही मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. तसंच पंजाब सरकारनं देखील लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा असा सल्ला दिला आहे. आता महाराष्ट्रात देखील मास्क सक्ती करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर राज्य सरकारनं महाराष्ट्र मास्कमुक्तीची घोषणा केली होती. मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आला. मात्र राज्यात पुन्हा मास्कसक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे.

 कारण कोविड टास्क फोर्सनं चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती लागू करण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना विषाणूचा पुन्हा वाढता प्रभाव हा चिंतेचा विषय असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अस मत ज्येष्ठ डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केलं आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरली आणि त्यासोबतच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुद्धा वेगाने सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या काल राज्यातील टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत बंदिस्त ठिकाणी मास्क घालणे सक्तीचे करावे अशी भूमिका टास्क फोर्स ने मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाहीये.

आज दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील मुख्यमंत्री यांची व्हीसीच्या माध्यमातून बैठक होणार आहे. या बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत. इतर राज्यात कोरोना रूग्णं संख्या वाढत असल्याने महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सतर्क झालं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!