भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

PFI संघटनेशी संबंधित चौघांना अटक,महाराष्ट्र ATS पुन्हा ॲक्शन मोड मध्ये

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात ATS पुन्हा ऍक्शन मोड मध्ये असून महाराष्ट्र एटीएसकडून (ATS) दोन पीएफआय (PFI) कार्यकर्त्यांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने रात्री उशिरा पनवेल येथून दोन पीएफआय लोकांना अटक केली आहे. केंद्र सरकारने पीएफआय आपल्या संघटनेवर बंदी घातली आहे. मात्र बंदी घातल्यानंतरही पीएफआय आपल्या संघटनेला पुढे नेण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली पीआयएफ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. पनवेल येथून अटक करण्यात आलेले दोघे पीएफआय संघटनेच्या विस्ताराशी संबंधित आहेत. दोन पीएफआय सदस्यांसह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. एटीएसने एकूण चार लोकांना अटक केली असून आणखी काही जणांची चौकशी सुरू आहे.

पीएफआयशी संबंधित हे सर्व लोक पनवेलमध्ये गुप्त बैठका घेत असल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीतून पीएफआयशी संबंधित या लोकांकडून रणनिती आखली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यातून एटीएसने छापा टाकून चौघांवर अटकेची कारवाई केलीय.

केंद्रीय गुप्तचर संस्था, एटीएस, एनआए आणि ईडी यांनी संयुक्तपणे पीएफआय या संस्थेबाबत तपास केला होता. या तपासासून गंभीर बाबी समोर आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसंच एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठकही घेतली होती. त्यानंतर पीएफआयवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आतापर्यंत पीएफआयशी संबंधित अनेक जणांवर अटक करण्यात आली आहे. राज्यातील मुंबई, नवी मुंबईसह वेगवेगळ्या भागातून पीएफआयशी संबंधित अनेकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात पीएफआयच्या कार्यलयावर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर पाच वर्षांसाठी पीएफआयवर बंदी घालण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!