२५ लाख कुटुंबांना वीज मोफत,खरा करून दाखवला दिलेला शब्द
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। निवडणुकीत दिलेला शब्द खरा करून दाखवत आम आदमी पक्षाने वीज मोफत दिली. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने जाहीर केले होते की ३०० युनिट वीज मोफत देणार. पंजाब सरकारने असा दावा केलाय की २५ लाख कुटुंबाला मोफत वीज दिली आहे. या सर्व कुटुंबाला वीज बील शुन्य आलेय. पंजाबमध्ये १ जुलै २०२२ पासून सर्वांसाठी ३०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा करण्यात आली होती. पंजाबचे उर्जा मंत्री हरभजन सिंह यांनी शनिवारी मोफत वीज बिलाची माहिती दिली.
पंजाब सरकारने दावा केलाय की, ३०० यूनिट फ्री वीज योजनामुळे पंजाबमधील सर्वसामान्यांना फायदा झालाय. झिरो वीज बीलवर पंजाब विद्युत विभागाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या याजनेचा सर्वाधिक फायदा ग्रामीण आणि शबरी भागातील गरीब लोकांना मिळाला आहे.
असे आहे अनुदान –
हवामानानुसार वीजेचा वापर कमी-अधिक होत असतो. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या पीएसपीसीएलच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जवळपास ६२.२५ लाख ही सरासरी ग्राहक संख्या आहे. यामध्ये मागील काही महिन्यातील वीज वापराच्या दृष्टीने काही निष्कर्ष काढले आहेत. पंजाब सरकारकडून याआधीच विविध योजनांनुसार घरगुती ग्राहकांसाठी दरवर्षी ३९९८ कोटींचे अनुदान दिले जाते. यामध्ये एससी/बीसी/बीपीएल ग्राहकांना याआधीपासूनच २०० युनिट वीज दर महिन्याला दिली जात आहे. यामध्ये 7 किलोवॅटचा वीज भार असणाऱ्या ग्राहकांना विविध स्लॅबसाठी ३ रुपये प्रति युनिट वीज दिली जात आहे.
राजकीय नेत्यांना लाभ नाही
पंजाब सरकारच्या मोफत वीज योजनेचा लाभ राजकीय लोकांना लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याबरोबरच सरकारी नोकरी करणाऱ्यांपैकी चौथ्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
महाष्ट्रातही देण्यात आली होती मोफत वीज –
सुशील कुमार शिंदे यांनी २००४ च्या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला सर्वांना फक्त हे अश्वासन असल्याचं वाटलं. त्यावेळी शिवसेनेनं काँग्रेसनं आमची घोषणा चोरल्याचा आरोप केला. त्यानंतर सुशील कुमार शिंदे म्हणाले की, ‘युती सरकार सत्तेत आल्यानंतर मोफत वीज देणार असतील तर आम्ही काँग्रेसवाले तुम्हाला निवडणुकीआधीच मोफत वीज देऊ…’ सुशीलकुमार शिंदे फक्त घोषणा करुन थांबले नाहीत.. तर शेतकऱ्यांना शून्य रकमेची बिले पाठवून घोषणा खरी असल्याचं दाखवलं. सुशीलकुमार शिंदे यांच्या या निर्णायाचा आघाडी सरकारला फायदा झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पुन्हा सरकार आलं. सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकारची पुन्हा सत्ता आली. सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली गेली नाही. विलासराव देशमुख यांना या खुर्चीत बसवण्यात आले. सुशीलकुमार शिंदे केंद्रात गेले… त्यानंतर विलासराव देशमुख यांनी सत्तेत आल्या आल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची योजना गुंडाळून टाकण्यात आली.