भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्रसामाजिक

मोफत धान्य ; मोदी सरकार घेतंय अन्न योजना अंतर्गत मोठा निर्णय

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पंतप्रधान अन्न योजना अंतर्गत मोठी बातमी आहे. सरकार PMGKAY मोफत रेशन योजनेंतर्गत सध्या ३ ते ६ महिने पुढे जाण्याचा विचार करत आहे. आगामी काळात रेशन ऐवजी लाभार्थींच्या खात्यावर थेट DBT च्या माध्यमातून पैसे जमा करण्याचा विचार करत आहे. रेशन की पैसे यांपैकी लाभार्थीला काय हवं याची निवड करण्याची मुभा त्याच्याकडे असणार आहे.

साधारण ८० कोटी लाभार्थ्यांच्या लीस्टला फिल्टर केलं जाण्याची शक्यता आहे. केवळ गरजू लोकांना याचा फायदा मिळणार आहे. ही योजना मार्च २०२० मध्ये सुरू करण्यात आली होती. कोरोना काळापासून गरजूंना मोफत धान्य दिलं जात होतं. आता सरकार फ्री धान्याऐवजी पैसे देण्याच्या विचारात आहे. याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.

या योजनेमध्ये बदल करण्याच्या विचारात सरकार आहे. पुढच्या आर्थिक वर्षात हे महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. या लिस्टमध्ये आता अनेक मापदंड लागू होण्याची शक्यता आहे. त्यानुसार आता या यादीतील नावं कमी होऊ शकतात. ज्यांना फ्री रेशनची गरज नाही अशा लोकांचा शोध घेऊन त्यांना लिस्टमधून काढलं जात आहे.

देशातील गरजू लोकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. ही योजना पंतप्रधानांच्या नावाने चालवली जाते. २०२३ पर्यंत या योजनेसाठी ८० कोटी रुपये खर्च होऊ शकतात अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. फ्री रेशन योजना ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर सरकार कोणता निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!