भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

गणेशोत्सव धुमधडाक्यात ; शेवटचे पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकरला परवानगी

मुंबई,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा।। गणेशोत्सवासह सर्व उत्सवांवर कोरोना आपत्तीमुळे निर्बंध होते परंतु हे सर्व निर्बंध राज्यसरकार ने पूर्णपणे उठवल्याने यंंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असून राज्य सरकारने शेवटच्या पाच दिवसांसाठी रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर वाजविण्याची परवानगी दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या आपत्तीमुळे गणेशोत्सवासह अन्य उत्सवांवर बंधने होती. एकनाथ शिंदे सरकारने आधीच सर्व उत्सवांवरील बंधने काढून टाकली आहेत. या पाठोपाठ काल रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय महत्वाची घोषणा केली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गणेशोत्सव मंडळांची बैठक झाली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. न्यायालयाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, धूमधडाक्यात साजरा करू. गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, गणेशोत्सवाच्या अखेरच्या पाच दिवसात रात्री बारा वाजेपर्यंत स्पिकर वाजविण्याची परवानगी असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा दणदणाटात साजरा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!