भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा वाढ…’इतक्या’ रुपयांनी वाढली किंमत

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला आहे. LPG सिलेंडर आज ता.1 डिसेंबर 2023 या वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून महाग झाला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी, तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या (एलपीजी किंमत वाढ) किमंतीत 21 रुपयांनी वाढवल्या आहेत, ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीवर करण्यात आली आहे.

बदललेल्या किमती १ डिसेंबरपासून लागू झाल्या आहेत. उल्लेखनीय आहे की दिवाळीपूर्वी तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 103 रुपयांची वाढ केली होती आणि 1 नोव्हेंबर 2023 रोजी दिल्लीत त्याची किंमत 1833.00 रुपये झाली होती, मात्र 16 नोव्हेंबरला त्यावर दिलासा मिळाला आणि सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी कमी होऊन 1775.50 रुपयांवर आली, मात्र वर्षअखेरीस पुन्हा एकदा भाव 21 रुपयांनी वाढले.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किमतींप्रमाणे दिल्लीत आजपासून 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1775.50 रुपयांऐवजी 1796.50 रुपयांना मिळणार आहे. तर कोलकातामध्ये त्याची किंमत 1885.50 रुपयांवरून 1908.00 रुपये करण्यात आली आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1728.00 रुपयांऐवजी 1749.00 रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये ते 1942.00 रुपयांऐवजी 1968.50 रुपयांना मिळेल.

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कायम आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने बदल होत आहेत, तर दुसरीकडे तेल विपणन कंपन्यांनी 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कायम ठेवल्या आहेत. IOCL वेबसाइटनुसार, दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये किमतीत उपलब्ध आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!