महाराष्ट्रात पुन्हा पेट्रोल-डिझेल महागलं, वाहन धारकांच्या खिशाला कात्री
मुंबई, मंडे टू मंडे न्युज। वाहन धारकांना सध्या वाहने चालवणं जिकरीचं झाले आहे. पेट्रोल-डिझेल चे दर कमी होण्याचं नावचं घेत नाहीय. उलट दर वाढतच आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल 80 पैशांनी तर डिझेल 77 पैशांनी महागलं आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोलच्या दरात 41 पैशांनी तर डिझेलच्या दरात 40 पैशांनी वाढ झाली आहे. याशिवाय राजस्थान, झारखंड आणि जम्मू-काश्मीरसह इतर काही राज्यांमध्येही इंधनाचे दर वाढले आहेत. तर गुजरातमध्ये पेट्रोल 41 पैशांनी आणि डिझेल 42 पैशांनी स्वस्त झाले आहे. मध्य प्रदेशात पेट्रोलच्या दरात 32 पैशांची तर डिझेलच्या दरात 30 पैशांची घट झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत आज फारसा बदल झालेला नाही. WTI क्रूड 0.30 टक्क्यांच्या वाढीसह 72.89 प्रति बॅरल डॉलरवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 77.06 डॉलरवरर व्यवहार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात.
चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर
– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा