पाकिस्तानात पेट्रोल-डिझेलचा भडका, घाम फुटेल भाव बघून
मुंबई,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। भारताच्याच शेजारी असलेल्या पाकिस्तान हा देश कंगाल होण्याच्या मार्गावर असून श्रीलंकेच्या वाटेवर आहे. जगभरातून मदतीसाठी त्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण पाकिस्तानला कोणीही मदत करण्यास अजून तरी कोणी पुढे आलेले नाही, पंतप्रधान शहबाज शरीफ नंतर आता काळजीवाहू सरकार आहे या सरकारने आल्या लआल्याच इंधन दरवाढ केली होती. जनता महागाईने मेटाकुटीला आलेली असतानाच
आता पुन्हा डिझेल-पेट्रोलच्या दरवाढीचा भडका उडविला. त्याचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर होणार आहे. अगोदरच पाकिस्तानमध्ये प्रत्येक वस्तू महागडी झाली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानी जनतेला
महागाईला सामना करावा लागेल.
पाकिस्तानच्या सरकारने पेट्रोल २६.२रुपये तर डिझेलमध्ये १७.३४ रुपयांची वाढ केली आहे. पाकिस्तानच्या यापूर्वीच्या सरकारने दिवाळे काढले, त्यांना कुठूनच मदत मिळवता आली नाही. म्हणून त्यांनी मुदतपूर्व राजीनामा दिला. आता काळजीवाहू सरकारने जनतेची काळजी दूर करण्याऐवजी महागाईत भर टाकत पेट्रोल डिझेल च्या किमती वाढवून त्यांची काळजी वाढवली .
गेल्या आठवड्यात आर्थिक सहकार्य समितीने पेट्रोलियम डीलर्स आणि तेल विपणन कंपन्यांच्या नफ्यात वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. काळजीवाहू सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरील नफ्यात ३ ५ 3.5 रुपये प्रति लिटर वाढीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे इंधन दरामध्ये वाढ झाली आहे. नवीन किंमतींनुसार पेट्रोल आता ३३१.३८ पाकिस्तानी रुपये प्रति लिटर तर डिझेल ३२९.१८ पाकिस्तानी रुपये प्रति लिटर झाले आहे.
या आधीची दरवाढ
याच महिन्याच्या सुरुवातीला काळजीवाहू सरकारने पेट्रोलच्या किंमतीत १४.९१ रुपये आणि डिझेलच्या किंमतीत १८. ४४ रुपये प्रति लिटरची वाढ केली होती. त्यापूर्वी शहबाज शरिफ सरकारने पेट्रोलच्या किंमतीत १९.९५ पाकिस्तानी रुपया आणि डिझेलच्या किंमतीत १९.९० पाकिस्तानी रुपयाची वाढ केली होती.