सोने-चांदी महागली! जाणून घ्या आजचे नवे दर
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून आली होती. आज गुरुवारला मात्र सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. आज सोने आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,000 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,280 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 581 रुपये आहे.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.