भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

सोन्या-चांदीच्या भावात वाढ, ग्राहकांना झटका

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सोन्या-चांदीने ऑक्टोबर महिन्यात मोठी उसळी घेतली. हमास-इस्त्राईल युद्धाच्या पडसादा मुळे सोन्या-चांदीने ऑक्टोबर महिन्यात मोठी उसळी घेतली होती, घसरणीवर असलेल्या मौल्यवान धातूंना या घडामोडींमुळे बळ मिळाले. अमेरिकन केंद्रीय बँकेने पण महागाईविरोधात कडत धोरण राबवले. त्याचा परिणाम दिसून आली. जागतिक गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराऐवजी सोने-चांदीत गुंतवणूक वाढवली. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा व्यस्त प्रमाणाचा फटका बसला. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला भावात घसरण झाली. दिवाळीपासून मौल्यवान धातूंनी पुन्हा महागाईचा सूर आळवला. असा आहे सोने-चांदीचा भाव

सोन्यानं घेतली भरारी
दिवाळीपासून सोन्याने मोठी भरारी घेतली. या काळात सोने 1500 रुपयांनी वधारले. या आठवड्यात 20 नोव्हेंबरला सोने 50 रुपयांनी स्वस्त झाले. 21 नोव्हेंबरला 380 रुपयांची झेप घेतली. 23 नोव्हेंबर रोजी किंमती 50 रुपयांनी उतरल्या. 25 नोव्हेंबर रोजी भावात 300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गुंतवणूकदारांची चांदी
चांदीने या दोन आठवड्यात मोठी भरारी घेतली. 13 नोव्हेंबरपासून आजपर्यंत चांदीने 5600 रुपयांची उसळी घेतली. 21 नोव्हेंबर रोजी किंमती 400 रुपयांनी वाढल्या. 22 नोव्हेंबर रोजी किंमतीत 400 रुपयांची घसरण झाली. 23 नोव्हेंबर रोजी 200 रुपयांची भाव वाढ झाली. 25 नोव्हेंबर रोजी किंमती 1000 रुपयांनी वाढल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 7,200 रुपये आहे.

काय भाव आहे 14 ते 24 कॅरेटचा
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,437 रुपये, 23 कॅरेट 61,191 रुपये, 22 कॅरेट सोने 56,276 रुपये झाले. 18 कॅरेट 46,078 रुपये, 14 कॅरेट सोने 35,941 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,046 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!