सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, काय आहे आजचा भाव
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। सोने-चांदीच्या किंमतींनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. तरी यापूर्वी चांदीत मोठी घसरण झाली आहे. या 3 जानेवारीपासून मौल्यवान धातूत घसरणीचे सत्र सुरु आहे. या आठवड्यातही पडझड सुरु होती. पण चांदीने अचानक झेप घेतली. चांदीत किलोमागे 200 रुपयांची वाढ झाली. गेल्या सात दिवसांत सोने 1200 रुपयांनी तर चांदी 2500 रुपयांनी घसरले आहे. किंमती घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोने-चांदीची अशी आहे किंमत
डिसेंबर 2023 मध्ये मोठी झालेल्या सोन्याने जानेवारीच्या सुरुवातीला ग्राहकांना दिलासा दिला. 3 जानेवारी पासून सोन्याच्या घसरणीला सुरुवात झाली, 4 जानेवारी ला 440 रुपयांची घसरण झाली. 5 जानेवारीला सोने 130 रुपयांनी घसरले. 6 जानेवारी रोजी त्यात 20 रुपयांची वाढ झाली होती. 8 जानेवारीला किंमती 220 रुपयांनी उतरल्या. 9 जानेवारीला शंभर रुपयांनी किंमत कमी झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत या वर्षाच्या सुरुवातीला घसरण दिसून आली. 3 जानेवारी रोजी 300 रुपयांची घसरण झाली. 4 जानेवारीला चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली. 8 जानेवारी रोजी 200 रुपयांची घसरण झाली. 9 जानेवारी किंमतीत तितकीच वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,600 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्याच्या किंमती वधारल्या. तर चांदी पण महागली आहे. 24 कॅरेट सोने 62,415 रुपये, 23 कॅरेट 62,165 रुपये, 22 कॅरेट सोने 57172 रुपये झाले. 18 कॅरेट 46,811 रुपये, 14 कॅरेट सोने 36,513 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,840 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.