सोनं पुन्हा महागलं, चांदीच्या दरातही वाढ
मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। २०२४ च्या सुरवातीला सोन्याच्या भावात पतझड पहायला मिळाली , परन्तु मकर संक्रांतीच्या दोन दिवस आधीच सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झालेली दिसली.
काल सोन्याच्या भावात ८८० रुपयांनी घसरण झालेली होती. मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी ओलांडली होती. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्या दोन दिवशी सोन्याच्या किमती वाढल्या होत्या.
मागील दहा दिवसांत सोने १३०० रुपयांनी तर चांदी ३१०० रुपयांनी घसरली होती. परन्तु अशातच आज सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली . मिळालेल्या माहितीनुसार या वर्षी सोन्या-चांदीचे दर नवीन रेक्रॉड ब्रेक करु शकतात.
२२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८१५ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,४२० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात ३२० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीही वाढल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी ७६,५०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीच्या किमतीत ५०० रुपयांनी वाढ झाली आहे