भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

सोन्याला सोन्याचे दिवस, सोने 55 हजारांच्या पार, चांदीच्या ही भावात वाढ

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा l वायदा बाजारात गुरुवारी 55,079 रुपयांवर सोन्याचे दर पोहोचले होते. बाजार बंद होताना 170 रुपयांनी तेजी पाहायला मिळाली. 10 ग्रॅम सोन्यासाठी 54,820 रुपये मोजावे लागत आहेत. तर 1 ग्रॅम सोन्यासाठी 5,482 रुपये मोजावे लागत आहेत.

MCX वर चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चांदीचा दर आज 13 रुपयांनी कमी होऊन 69,696 रुपये प्रति किलो झाला आहे. आज चांदीचा भाव वाढून 74,960 रुपये झाला आहे. काल पुन्हा एकदा हा भाव ६९,७७० रुपयांवर गेला. काल एमसीएक्सवर चांदी 47 रुपयांनी वाढून 69,689 रुपयांवर बंद झाली होती. मंगळवारी चांदीच्या दरात 2,118 रुपयांची वाढ झाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर तेजीत आहेत. तर चांदी स्वस्त झाली आहे. सोन्याचे भाव 0.08 टक्क्यांनी वाढले आहे. तर चांदीचे भाव 0.58 टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं आहे. बुधवारी चांदीचे दर 4 टक्क्यांनी वधारले होते. मात्र पुन्हा चांदीचे दर घरसले आहेत. भारतातील सोने आणि चांदीच्या किंमती डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यासह अनेक घटकांवर अवलंबून असतात. जागतिक मागणीचा परिणाम सोन्याच्या दरांवरही होतो. बँक ऑफ जपानने धोरणात बदल केल्यामुळे सोन्यात नुकतीच वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बँक ऑफ जपानने म्हटले आहे की यामुळे बेंचमार्क बाँडचे उत्पन्न वाढू शकेल. जपानच्या या निर्णयामुळे डॉलर इंडेक्समध्ये घसरण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!