भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

सोन महागल, चांदीच्या दरातही वाढ, जाणून घ्या आजचे दर

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या आठवड्यात सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून आली होती. सोमवारी या आठवड्याच्या सुरवातीला सोन्याच्या दरात घसरण दिसून आली होती. मात्र आज सोन्याच्या दरात वाढ दिसून येत आहे तर चांदीचे दरही महागले आहेत.

आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 50,250 तर 24 कॅरेटचा 54,820 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 701 रुपये आहे. 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!