सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. आजही सोने स्वस्त झाले आहे. यासोबतच चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतही सोने स्वस्त झाले असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येत आहे.
आज दिल्ली सराफा बाजारात सोने 60,000 च्या आसपास बंद झाले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे. मुंबई, कोलकाता, केरळा, बंगळूर आणि हैदराबाद येथे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 55 हजार 150 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60 हजार 160 इतकी आहे.
सोने-चांदी किती स्वस्त झाले?
दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 100 रुपयांनी घसरून 60,350 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर गेला आहे. त्याच वेळी, सोन्याचा भाव गेल्या सत्रात 60,450 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. याशिवाय चांदीचा भावही 200 रुपयांनी घसरून 77,000 रुपये किलो झाला.
दिल्लीत सोन्याचे भाव कमी झाले आहेत. 100 रुपयांच्या तोट्यासह ते 60,350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर इतके झाले आहेत, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) सौमिल गांधी यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,963 डॉलर प्रति औंस होता. चांदीचा भावही घसरणीसह 24.60 डॉलर प्रति औंसवर होता.