सोनं महागलं, वर्षाच्या अखेरीस जाणार “इतके” हजार रुपये प्रति तोळा, चांदीच्या दरात मात्र घसरण
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गुढीपाडव्याच्या तोंडावरच सोनं महाग झालंय. एवढंच नाही तर लग्नसराई देखील सुरु होतेय. यामुळे सोनं खरेदीदारांची लगबग सुरु आहे. मात्र त्यांच्या सोनं खरेदी करु इच्छिनाऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण आज गुरुवारी सोन्याच्या भावात तेजी पाहायला मिळाली.
सोन्याचे भाव हे 58 हजारांच्या पार गेले आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 16 मार्चला सोनं 213 रुपयांनी महाग होऊन 58,115 रुपये प्रति ग्रामवर पोहोचलंय.
IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितले की, शेअर बाजारात सुरू असलेल्या चढ-उतारामुळे सोन्याला सपोर्ट मिळत आहे. यामुळे या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा दर 65 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर जाऊ शकतो.
चांदीमध्ये घसरण : 999 शुद्धतेच्या चांदीच्या किंमतींमध्ये आज घट झाली आहे. आज चांदी 361 रुपयांनी स्वस्त होऊन 66,500 रुपये किलो झाली आहे. एक दिवस आधी म्हणजेच 15 मार्च रोजी तो 66,861 हजारांवर पोहोचला होता.