भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त! नवे दर जाणून घ्या

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. दिवाळीच्या तोंडावर तर सोने चांदीचे दर महागल्याचेही दिसून आले. आजपासून दिवाळीला शुभारंभ होत आहे त्यामुळे सोने चांदीच्या दरात तेजी अपेक्षित आहे. अशात ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसला सोने चांदीचे दर घसरले आहे.

आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ४६,३५० रुपये तर २४ कॅरेट साठी ५०,५६० रुपये आहे तर १० ग्रॅम चांदीचा दर ५६१ रुपये आहे. सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. २४ कॅरेटवर ९९९,२३ कॅरेटवर ९५८२२ कॅरेटवर ९१६,२१ कॅरेटवर ८७५ आणि १८ कॅरेटवर ७५० लिहीलेलं असतं. बहुतेक सोने २२ कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक १८ कॅरेट देखील वापरतात. सोने २४ कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!