महाराष्ट्र

सोन्याची चलती, सोन्याने खाल्ला भाव, पहा आजचा भाव

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। लग्नसराईचे दिवस आहेत. याच दिवसांमध्ये सोन्याला खूप मोठी मागणी असते. सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. MCX वर सोने ५४,०९९ च्या जवळपास पोहोचलं आहे. तर एमसीएक्सवर चांदीचा भाव ६६१०० च्या पुढे गेला आहे.

सोन्याने कॉमेक्सवर १७८० डॉलरचा टप्पा पार केला आहे, तर चांदी २२.५० डॉलरच्या वर राहिली आहे. जर तुम्ही कॉमेक्सवर सोन्याची चलती पाहिली तर १ आठवड्यात ४ टक्के आणि १ महिन्यात ४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्याचबरोबर १ वर्षात त्यात ४६ टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीमध्ये १ आठवड्यात १ टक्के आणि १ महिन्यात ७ टक्के वाढ झाली आहे. १ वर्षात त्यात ३ टक्के वाढ झाली आहे.

एमसीएक्सवर सोन्याची वाटचाल पाहिली तर १ आठवड्यात १ टक्के आणि १ महिन्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर १ वर्षात त्यात १२ टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर १ आठवड्यात २ टक्के आणि १ महिन्यात ६ टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर १ वर्षात त्यात ८ टक्के वाढ झाली आहे.
२४ कॅरेट १ ग्रॅम -५,४००
२४ कॅरेट १० ग्रॅम – ५४,०००
२२ कॅरेट १ ग्रॅम – ४,९५०
२२ कॅरेट १० ग्रॅम-४९,६०१

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!