सोन्याच्या भावात पुन्हा घसरण, चांदीही झाली स्वस्त
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सप्टेंबरच्या शेवटच्या सत्रात सोने-चांदीचा भाव दणकावून आपटला. ऑक्टोबरच्या पहिल्या सत्रातच सोने-चांदी नापास झाले. भावात पुन्हा मोठी घसरण झाली. सोने-चांदी स्वस्ताईमागे जागतिक घडामोडी आहेत, तशाच काही स्थानिक कारणांचा समावेश आहे. सध्या पितृपक्ष सुरु आहे. अनेक भारतीय परंपरेप्रमाणे या काळात सोने-चांदीची खरेदी करत नाही. मागणी घटल्याचा परिणाम सोने-चांदीच्या भावावर दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही धातूमधील हा घसरण ग्राहकांच्या पथ्यावर पडत आहे. काही तज्ज्ञांनी तर सोने आणि चांदीत दिवाळीपर्यंत आणखी घसरणीचा अंदाज वर्तवला आहे. दोन्ही धातूंचा डॉलरसमोर निभाव लागणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे. सध्या सोने-चांदीचा भाव असा आहे.
सोन्याचे भाव उतरले
गुडरिटर्न्सनुसार, गेल्या महिन्यात सोन्याला कामगिरी बजावता आली नाही. 15 ते 19 सप्टेंबर या काळातच सलग तेजीचे सत्र, 700 रुपयांनी सोने वधारले होते. त्यापूर्वी आणि अखेरच्या सत्रात घसरणीचे सत्र होते. 28 सप्टेंबर रोजी सोन्यात 650 रुपयांची स्वस्ताई आली. 29 सप्टेंबर रोजी सोने 250 रुपयांनी घसरले. 30 सप्टेंबर रोजी सोने 300 रुपयांनी स्वस्त झाले. तर 1 ऑक्टोबर रोजी मोठा बदल झाला नाही. 2 ऑक्टोबर रोजी सोने 150 रुपयांनी घसरले. 22 कॅरेट सोने 53,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,190रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
चांदी झाली पुन्हा स्वस्त
गेल्या महिन्यात चांदीला मोठी मजल मारता आली नाही. पहिल्या सत्रात चांदीत 5000 रुपयांची घसरण झाली. 22 तारखेला 1 हजारांनी किंमती वधारल्या. 27 सप्टेंबर रोजी 600 तर 28 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी चांदी घसरली. 29 सप्टेंबर रोजी हजार रुपयांनी भाव वधारले. 30 सप्टेंबर रोजी चांदीत 1200 रुपयांची स्वस्ताई आली. 1 ऑक्टोबर रोजी भाव जैसे थे होते. 2 ऑक्टोबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 73,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट असा आहे भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 57,719 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 57,488 रुपये, 22 कॅरेट सोने 52,871 रुपये, 18 कॅरेट 43,289 रुपये, 14 कॅरेट सोने 33,766 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,603 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.