भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

सोनं- चांदी झाली स्वस्त, दिवाळी गोड होणार

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ग्राहकांना सोन्याने दिलासा दिला आहे. चांदीने मात्र हिरमोड केला होता. या आठवड्यात सोन्याने माघार घेतली तर चांदीची आगेकूच सुरु होती. भाव घसरल्याने दिवाळी गोड होणार आहे. अनेक महिन्यांचा रतीब बाजूला सारत सोने-चांदीने ऑक्टोबर महिन्यात 4 हजारांची मसबदारी घेतली. या दरवाढीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. दिवाळीत सोने-चांदीच्या स्वस्ताईवर पाणी फेरले. मंगळवारी सोन्यासह चांदीने पण आनंदवार्ता दिली. दोन्ही मौल्यवान धातूत घसरण झाली. धनत्रयोदशीपूर्वी ही घसरण कायम राहिल्यास ग्राहकांच्या खिशावर ताण येणार नाही. असा आहे सोने-चांदीचा भाव..

1500 रुपयांनी सोने झाले स्वस्त
गेल्या दहा दिवसांत सोन्यात घसरणीचे सत्र आहे. 1500 रुपयांनी सोने स्वस्त झाले. या आठवड्यात 250 रुपयांची घसरण झाली. यापूर्वी 4 नोव्हेंबर रोजी सोने 110 रुपयांनी उतरले. 5 नोव्हेंबरमध्ये बदल झाला नाही. तर 6 नोव्हेंबर रोजी 150 रुपयांनी भाव उतरले. 7 नोव्हेंबर रोजी 100 रुपयांची घसरण झाली. आता 22 कॅरेट सोने 56,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत गेल्या महिन्यात घसरण झाली. पण गेल्या आठवड्यात 2 नोव्हेंबर रोजी चांदीने 700 रुपयांची उसळी घेतली आणि नंतर तेवढीच घसरण झाली. 4 नोव्हेंबर रोजी त्यात 900 रुपयांची वाढ झाली. 6 नोव्हेंबर रोजी चांदी 200 रुपयांनी महागली. 7 नोव्हेंबर रोजी किंमतीत 700 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,579 रुपये, 23 कॅरेट 60,336 रुपये, 22 कॅरेट सोने 55,490 रुपये झाले. 18 कॅरेट 45,434 रुपये, 14 कॅरेट सोने 35,439 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदी घसरली. एक किलो चांदीचा भाव 70,705 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!