भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

सोने-चांदीची जोरदार मुसंडी, एकाच दिवसात विक्रमी झेप

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सोने-चांदी आता 63 हजारांच्या दिशेने तर चांदी 77 हजारांच्या दिशेने आगेकूच करत आहे. सोने-चांदीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड इतिहास जमा केले. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्याने मुसंडी मारली. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,913 रुपये प्रति 10 ग्रॅम अशी होती. 4 मे 2023 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,646 रुपये असे होते. हा रेकॉर्ड मोडीत निघाला. सोन्याने जवळपास 300 रुपयांची झेप घेतली. चांदी 75,000 रुपयांच्या घरात पोहचली. पण बुधवारी मौल्यवान धातूंनी पुन्हा जोरदार उसळी घेतली. सोने-चांदीने पुन्हा नवीन विक्रम नावावर कोरला.

सोने-चांदीची जोरदार मुसंडी
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,913 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. आता सोन्याचा भाव 62,629 रुपयांवर पोहचला आहे. चांदी पण चमकली आहे. एक किलो चांदीसाठी 75,700 रुपये मोजावे लागतील. तज्ज्ञांच्या मते, चांदी अजून जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे.

24 कॅरेट 63,530 रुपये किंमत
सोन्यात दिवळीपासून मोठी दरवाढ झाली. गेल्या आठवड्यात सोन्यात 700 रुपयांची वाढ झाली. सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी सोने 250 रुपयांनी महागले. 28 नोव्हेंबर रोजीचा भाव अपडेट झाला नाही. 29 नोव्हेंबर रोजी भाव 820 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची भरारी
गेल्या दोन आठवड्यात चांदीने गगन भरारी घेतली. गेल्या आठवड्यात 1400 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. 27 नोव्हेंबर रोजी किंमती 1000 रुपयांनी वाढल्या. 28 नोव्हेंबर रोजी किंमती अपडेट झाल्या नाहीत. 29 नोव्हेंबर रोजी भावात 700 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 79,200 रुपये आहे.

सोने 14 ते 24 कॅरेटचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,629 रुपये, 23 कॅरेट 62,378 रुपये, 22 कॅरेट सोने 57,368 रुपये झाले. 18 कॅरेट 46,972 रुपये, 14 कॅरेट सोने 36,638 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 75,700 रुपये झाला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!