सोने पुन्हा उसळी घेणार!चांदी “इतक्या” हजारांचा टप्पा गाठणार!
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सोने खरेदी करण्याचा विचार करत असला तर सोन्याच्या किंमतीत जोरदार वाढ झालेली आहे. वायदे बाजारात सोन्याचा भाव 57,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. तर चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. या पूर्ण आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजीचे सत्र कायम आहे. किरकोळ घसरणी दिसली तरी सोने पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे. आज गुरुवारी चांदीचा भाव 67,700 रुपयांच्या जवळपास व्यापार करत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सोने आता 60,000 रुपयेच नाही तर 62 हजारांपर्यंत धडक देऊ शकते. तर चांदी 80 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.
वायदे बाजारात सोन्याच्या भावात 0.04 टक्क्यांची वाढ झाली. सोन्याची किंमत 57240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या व्यापारी सत्रात सोन्याचा भाव 57215 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. तर चांदीच्या किंमतीत 0.10 टक्क्यांची वाढ झाली. आज चांदीचा भाव 67,699 रुपये प्रति किलो आहे. काल हा भाव 67,551 रुपये प्रति किलो आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने भरारी घेतली आहे. सोन्याचा भाव वाढलेला आहे. आज सोन्याच्या भावात 0.31 टक्के वाढ होऊन ते 1,890.70 डॉलर प्रति औस होता. तर चांदीत 1.10% वाढ दिसून आली. चांदीचा भाव 22.42 डॉलर आहे. परदेशात सोन्याचा भाव वाढत आहे.
इंडियन बुलियन आणि ज्वैलर्स असोसिएशन नुसार, आज सराफा बाजारात सोन्याचा भाव 57,538 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा भाव 67,516 रुपये प्रति किलो आहे. या भावात आणखी वाढीचा शक्यता आहे.