भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीय

सोन्याची चमक वाढली, मात्र चांदीच्या भावात घसरण, काय आहे भाव

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सराफा बाजारात जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम दिसून आला. चांदीच्या दरवाढीला ब्रेक मिळाला तर सोन्याचा भाव पुन्हा वधारला, गेल्या ऑगस्ट महिन्यातही दोन्ही धातूंच्या दरवाढीला मोठा ब्रेक मिळाला होता. या महिन्यात सोने-चांदी किती वधारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जागतिक घडामोडी सोने आणि चांदीसाठी सध्या अनुकूल आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत सोने-चांदीने चांगली वधारली आहे. त्यापूर्वी दोन्ही धातूंना मोठी उसळी घेता आली नाही. दरवाढीला सातत्याने ब्रेक लागला. 21 ऑगस्टपासून दोन्ही धातूंनी चढाई सुरु केली. ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यात सोने 800 रुपयांनी वधारले तर चांदी जवळपास 4000 रुपयांनी वाढली. सप्टेंबर महिन्यात गेल्या दोन दिवसांत सोने-चांदीचे तळ्यातमळ्यात सुरु आहे. पहिल्या दिवशी दोन्ही धातूंमध्ये किंचित घसरण आली तर दुसऱ्या दिवशी सोने वधारले तर चांदीत मोठी घसरण दिसून आली. आता सप्टेंबर महिन्यात सोने-चांदी किती मुसंडी मारते हे स्पष्ट होईल. दोन्ही धातूंना अद्याप पण फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यासारखा रेकॉर्ड करता आला नाही, हे मात्र खरे आहे.

गुडरिटर्न्सनुसार, 29 ऑगस्ट रोजी 250 रुपयांची दरवाढ झाली. 30 ऑगस्ट रोजी सोन्यात 300 रुपयांची वाढ झाली. 31 ऑगस्ट रोजी 160 रुपयांनी किंमती वधारल्या. 1 सप्टेंबरला भाव घसरले. तर 2 सप्टेंबरला 150 रुपयांची वाढ झाली. 22 कॅरेट सोने 55,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,370 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.

या महिन्यात चांदीला कमाल करता आली नाही. चांदीत किलोमागे 700 रुपयांची घसरण झाली. 1 सप्टेंबर रोजी चांदीत 500 रुपयांची तर 2 सप्टेंबर रोजी चांदीत 200 रुपयांची घसरण झाली. ऑगस्ट महिन्यात 16 ऑगस्टनंतर चांदीने मोठी भरारी घेतली होती. चांदीत जवळपास 4000 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली होती.. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,900 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 59,489 रुपये, 23 कॅरेट 59,251 रुपये, 22 कॅरेट सोने 54,492 रुपये, 18 कॅरेट 44617 रुपये, 14 कॅरेट सोने 34,801 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 74,838 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!