भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी ; छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडनमधील जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणणार?

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्ताची छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडनमध्ये असलेली जगदंबा तलवार महाराष्ट्र पाहायला मिळावी अशी इच्छा आहे. राज्यात असलेल्या शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर पाऊल ठेवताच प्रत्येकालाच या जगदंबा तलवारीते स्मरण होते. याच शिवभक्तांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. शिवरायांच्या लंडनमधील जगदंबा तलवारीचे महाराष्ट्रात दर्शन होणार आहे. जगदंबा तलवार आणि वाघ नखे महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहेत.

३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा आणि आगामी सर्वच निवडणुका पाहता यावर्षीच तलवार आणि वाघ नखे देशात राज्य सरकार आणणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुनगंटीवार आणि काही अधिकारी जून महिन्यात लंडनला जाणार आहेत. शिवराज्याभिषेकाला २०२४ मध्ये ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकार कडून एक आराखडा तयार करण्यात आला आहे. ब्रिटन सरकारजवळ या संदर्भात अंतिम टप्प्यात बोलणे सुरु आहे.

ब्रिटन सरकार आणि राज्य सरकारमध्ये नेमकी कोणती चर्चा सुरु?
● महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघ नखे काही काळासाठी भारतात पाठवण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे
● वर्षभर वाघ नखे आणि तलवार देशात असतील
● राज्यातील सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अधिकारी जून महिन्यात या संदर्भात चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये जाणार आहेत
● सांस्कृतिक आदान प्रदानासाठी महाराष्ट्रातील कलाकार ब्रिटनमध्ये सादरीकरण करतील आणि ब्रिटनचे कलाकार महाराष्ट्रात येऊन आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवतील.
● महाराष्ट्राचे २५ विद्यार्थी ब्रिटनमध्ये अभ्यासासाठी जातील आणि ब्रिटनचे २५ विद्यार्थी महाराष्ट्रात येतील.
● या सांस्कृतिक आदानप्रदानासंदर्भात महाराष्ट्र शासन आणि ब्रिटीश सरकारमधे लवकरच सामंजस्य करार होणार आहे.

राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कार्यक्रम
राज्यात छात्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे होत आहे. त्यानिमित्ताने राज्यात शंभरपेक्षाही जास्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, शिवाजी महाराजांचे वंशज आणि अन्य नागरिकांना बोलवण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्य शासन राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे. त्या अनुषंगाने महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघनखे ब्रिटनकडून आणण्यात येणार असून ते देशात सर्वांना पाहता यावे यासाठी देशभर फिरवण्यात येईल अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!