आनंदाची बातमी : शिधापत्रिका धारकांना फक्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आगामी गुढी पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यभरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शिधापत्रिका धारकांना फक्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अध्यक्षस्थानी होते. राज्यातील शिदा पत्रिका धारक1 कोटी 63 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. हे कार्ड असलेल्या नागरिकांना केवळ 100 रुपयात महत्त्वाच्या चार गरजेच्या वस्तू मिळणार आहेत.
काय काय 100 रुपयात ?
केशऱी कार्ड धारक अर्थात शिक्षापत्रिका धारकांना 100 रुपयात 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो साखर तसेच 1 लीटर पामतेल असा आनंदाचा शिधा मिळणार आहे. गुढीपाडव्यापासून पुढील 1 महिनाभर ही योजना सुरु राहील. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे. ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात हा शिधा दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.
महाटेंडर्सद्वारे निविदा प्रक्रिया राबवणार
हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे प्रक्रिया सुरु केली जाईल. तसेच 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279रुपये प्रति संच या दरानुसार 455कोटी 94लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.