मोठी बातमी : भाजपची पाचवी यादी जाहीर, त्यात राज्यातील तीन नावे,बॉलिवुडची अभिनेत्री कंगणा राणावतलाही उमेदवारी
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता सर्वच पक्ष आता उमेदवार जाहीर करत आहे. भाजपची आता पाचवी यादी जाहीर झाली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील तीन जागांचे उमेदवारांची नावे समोर आली आहेत. भाजपचे माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते यांचं नाव आहे. जी दुसरी नावे आहेत त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. यामध्ये एक कलाविश्वातील मोठं नाव बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा राणावतचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कंगना राणावत कुठून लढणार?
कंगना राणावतला हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मंडी लोकसभा मदतदार संघात आता काँग्रेसच्या प्रतिभा सिंह विद्यमान खासदार आहेत. ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी भाजपने कंगनाला उमेदवारी देत मोठा डाव खेळला आहे. कंगना ही कायम आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळते.
महाराष्ट्रातील तीन उमेदवार कोणते?
पाचव्या यादीमध्ये भंडारा-गोंदियामधून सुनील मेंढे, गडचिरोली चिमूरमधून अशोक नेते आणि सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामधील सुनील मेंढे आणि अशोक नेते हे विद्यमान खासदार असून त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे.