भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

काँग्रेसला मोठं खिंडार, आमदाराचा राजीनामा देत शिंदे शिवसेनेत प्रवेश

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विदर्भातील काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच राजू पारवे यांनी आमदारकीचादेखील राजीनामा दिला आहे. राजू पारवे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश झाल्याची माहिती समोर येत आहे. स्वत: राजू पारवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पक्षप्रवेश केल्याची माहिती दिली . राजू पारवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज दाखल झाले. राजू पारवे हे शिवसेनेच्या तिकीटावर रामटेक लोकसभेची जागा लढवणार आहेत. राजू पारवे यांनी यावेळी त्यांनी आपली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं.

“या देशाचे लोकमान्य नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. सोबतच या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमचे नेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वात मला काम करण्याची संधी मिळाली. आता मी महायुतीसोबत काम करणार आहे. मी या सर्व नेत्यांचे खूप धन्यवाद मानतो”, अशी प्रतिक्रिया राजू पारवे यांनी दिली.

‘मी सर्व नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला’
“शेवटी विकासाचं राजकारण महत्त्वाचं आहे. आपल्या विभागाचा विकास झाला पाहिजे. रामटेक मतदारसंघाचा विकास कसा होईल, यासाठी माझं काम असलं पाहिजे. मी सात महिने बाकी असताना माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून काम करण्याची माझी इच्छा आहे. मी सर्व नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. रामटेकबद्दल कमिटमेंट झालं आहे. रामटेकची लोकसभेची जागा मी लढणार आहे”, अशी माहिती स्वत: राजू पारवे यांनी दिली.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आज जोरदार बैठकांचं सत्र सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वर्षावर दाखल झाले त्यानंतर लगेच उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील वर्षा बंगल्यावर दाखल झाले. या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. विशेष म्हणजे आजच्या बैठकीत रासप नेते महादेव जानकर यांना लोकसभेत एक जागा देण्याबाबतचा निर्णय झाला. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी बैठक संपल्यानंतर माध्यमांना याबाबत माहिती दिली. यानंतर अजूनही महायुतीची वर्षा बंगल्यावर बैठक सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!