भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

मोठा दिलासा ; महाराष्ट्रात पेट्रोल -डिझेल स्वस्त, भाव घसरले

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आज महाराष्ट्रात पेट्रोलचा दर ६२ पैशांनी घसरून १०५.९६ प्रतिलिटर झाला आहे. तर डिझेल ६० पैशांनी घसरून ९२.४९ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. मध्य प्रदेशात पेट्रोल ३० पैशांनी तर डिझेल २८ पैशांनी स्वस्त झाले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही पेट्रोल-डिझेल थोडे स्वस्त झाले आहे. तर राजस्थानमध्ये पेट्रोल ४० पैशांनी महागले असून १०८.८८ रुपये आणि डिझेल ३६ पैशांनी महागले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत आज थोडीशी घसरण झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूडप्रति बॅरल ७१.१९ डॉलरवर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ०.६३ डॉलरने घसरून प्रति बॅरल ७५.९८ डॉलरवर विकले जात आहे. त्यातच आता देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल १०६.०३ रुपये और डीजल ९२.७६ रुपये प्रति लीटर

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!