भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात उन्हाचा कडाका वाढला, हवामान विभागाकडून उष्णतेचा इशारा

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l हवामान विभागाकडून महाराष्ट्रात उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानात मोठी वाढ झाली असून, कमाल तापमान ४० अंश सेल्सियस ते ४५ अंश सेल्सियसच्या घरात पोहोचलं आहे. वाढत्या तापमानामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे

हवामान विभागाने दिलेल्या माहिती अनुसार आज सोलापूर, बीड, लातूर, आणि मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान हे ४०;अंश सेल्सियस ते ४५ अंश सेल्सियसच्या आसपास असणार आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र, पुणे, आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान हे ३५;अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरात प्रामुख्याने निरभ्र आकाश राहणार असून, पुढील 5 दिवसांत उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३ अंश सेल्सियस आणि २३ अंश सेल्सियस च्या आसपास असेल

विदर्भात सूर्य आग ओकत आहे. उपराजधानी असणाऱ्या नागपुरात सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. आजही नागपुरातील कमाल तापमान हे ४२ अंशांपर्यंतच राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना तीव्र उन्हाचा आणि उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. भारतीय हवामान खात्याने असं जाहीर केलं आहे, की भारतात यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत उन्हालाचा कडाका सरासरीपेक्षा अधिक अनुभवायला मिळेल. देशाच्या बहुतांश भागांत सर्वसामान्यपेक्षा अधिक तापमान नोंदवलं जाण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या सर्वाधिक तापमानाची नोंद ही मराठवाडा विभागात होत असून, गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ४० ते ४५ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!