पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस ; ” या ” राज्यात होणार पूरसदृश्य परिस्थिती
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्रातील काही भागात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी महाराष्ट्राशेजारील राज्यातून मात्र मुसळधार पाऊस होत आहे. मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात गेल्या अनेक दिवसांपासून बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र गुजरात, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून हवामान खात्याकडून येत्या काही दिवसात विविध राज्यांच्या हवामाना खात्याच्या सुचनेनुसार सांगितले आहे की, आसाम, मेघालय, तामिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे काही भागात पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने (IMD) तमिळनाडू, मेघालय इत्यादी राज्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता असून विदर्भात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
विदर्भात रविवारपासून कोसळणार
हवामान खात्याच्या ट्विटच्या माहितीनुसार विदर्भात २८ ऑगस्ट, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये २५ ते २८ ऑगस्ट २०२२ दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार आहे. तर २७ ऑगस्ट रोजी ओडिशामध्ये, २७ ते २९ ऑगस्ट रोजी पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये आणि २७ आणि २८ ऑगस्ट रोजी दक्षिण पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
पुढील ५ दिवस मध्यम आणि जोरदारही
हवामान खात्याच्या माहितीनुसार नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये २७-२९ ऑगस्ट आणि २५-२९ ऑगस्ट दरम्यान आसाम आणि मेघालयमध्ये पुढील पाच दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर याचवेळी २७ ऑगस्ट रोजी अरुणाचल प्रदेश आणि आसाम आणि मेघालयमध्ये मात्र मुसळधार पावसाची शक्यता आहे.