भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस, अलर्ट जारी

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढच्या दोन दिवसात समुद्र किनारावरील भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईसह राज्यात शनिवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यात गारवा निर्माण झाला आहे. तसेच उशिरा का होईना पण पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजाही सुखावला आहे. मुंबईत तर पावसाने दाणादाण उडवली आहे.

दोन दिवस जोरदार पाऊस का?
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. गुजरातच्या कच्छ भागात घोंघावणारं वादळ आणि महाराष्ट्राच्या समुद्र किनारी भागापासून ते कर्नाटकपर्यंत पसरलेली सक्रिया ट्रफ आदी कारणांमुळे येत्या ४८ तासात कोकणसहीत मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात अति जोरदार पाऊस पडणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर दक्षिण-पश्चिम मान्सून वेगाने पुढे सरकत असून अधिकाधिक क्षेत्रांना व्यापून टाकत आहे.

महाराष्ट्रासह काही राज्यात मुसळधार पाऊस- वायव्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाच्या प्रभावाखाली प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मान्सून उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची दाट शक्यता आहे. देशभरात गेल्या २४ तासांबद्दल कर्नाटक, कोकण, ओडिशाचा काही भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला आहे. झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!