भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कोकणासह सध्या पावसाची संततधार सुरू आहे. पुणे आणि सातारा यांसारख्या जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या १३ सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसारख्या किनारी जिल्ह्यांतील निर्जन भागांमध्ये येत्या शुक्रवार ते रविवार या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तण्यात आली आहे. नशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. तर शहरी भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तसेच धरणांच्या पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ झाली होती.

विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचं धुमशान बघायला मिळण्याची शक्यता आहे. तर  काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यातच आला आहे. विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं आज मराठावाड्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील मच्छिमारांना देखील पुढील पाच दिवस अरबी समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील पाच दिवसात पावसाचा जोर बघता, भारतीय हवामान विभागाकडून सर्वांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!