भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आजचा दिवस महाराष्ट्रात महत्त्वाचा असणार आहे. पावसा संदर्भात हवामान विभागाकडून अतिशय महत्वाची माहिती देण्यात आली आहे. राज्यात सर्वदूर आता मान्सून दाखल झालाय. मुंबई, ठाणे जिल्ह्यासह कोकणात पावसाने गेल्या चार दिवसांमध्ये चांगलीच बॅटिंग केली आहे. तसेच पाऊस पुढचे दोन-तीन दिवस असाच बरसण्याची शक्यता आहे. पण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तो वेगवेगळ्या प्रमाणात बरसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने २८ जून बुधवार साठी सहा जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट जारी केला आहे. या सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये बुधवारी मुसधाळ ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढच्या चार दिवसांमध्ये पाऊस कसा असेल?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २९ जूनला महाराष्ट्रातील पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलं आहे.


हवामान विभागाने ३० जूनसाठी फक्त रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने १ जुलैसाठी रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट जारी केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!